Friday, November 4, 2011

फुलसुंदरी

ऋतू वसंत होता
होती पहाटेची वेळ
शहरातल्या बागेमध्ये
होती बहरली वेल
पहाटेच्या धुक्यामध्ये
होती न्हाली फुले
त्यांतही अतीसुंदर
होतीस तू गडे
सारून अंधार रातीचा
आले रवीचे दूत
पण होतीस तू चिंब
धुंदीत अपुल्या धुंद
वारा होता गात
कसले बेताल गाणे
पण त्याही नादावारती
होतीस झुरत तू गडे
न कळले मला कधीही
तुझे ते अबोल झुरणे
झुरण्यातील तुझ्या ती जादू
मम चित्त नकळत झुरवे
होता नादावर त्या धुंद
दिसले नभीचे प्रीतरंग
अवघी वसुंधरा भरिली
पसरे अनोखा एक गंध
करून निश्चय मनीचा
सरसावलो मी पुढे
करीन प्रेम जीवापाड
जरी फुलपाखरू मी इवले
वेलीकडून मागीतले तुला
फुलांतूनही तुलाच निवडले
लाजलीस अशी मान वळवून
फुलराणी ग तू माझीच सखे
वेळी फुलांच्या साक्षीने
होईल लगीन अपुले
जाऊ जोडीने मग आपण
राविरायाच्या आशिर्वादाला
स्वप्ने होती अनेक मनात
उतरवले नाही ज्यांना शब्दांत
नशिबाने फिरवली चक्रे अशी
स्वप्ने तुटली जाग येत क्षणी
कुणीतरी धरीले मला
रंगीत नाजूक माझ्या पंखांना
टाकले काचेच्या बाटलीत एका
केले नंतर झाकणबंद तिला
क्षमा याचना करुनी थकलो
एकदा तरी पाहुद्या तिला
टाहो फोडुनी ओरडू लागलो
तरी नाही आली दया त्यांना
बाटलीतून नेताना मला
पहिले मी वेलीकडे एकवार
पाहुनी झाली अवस्था माझी
एकदा नाही हजारदा मेल्यासारखी
मला बाटलीतून नेताना पाहून
हासत होत्या फुलवेली
तिच्याकडे पाहता थोडे वळून
तिने हसून चक्क मान वळवली
बाटलीतून जाता जाता
आले भरून डोळे
जेंव्हा तिच्या हसण्यातले
मर्म मना उमगले

No comments:

Post a Comment