Tuesday, February 14, 2012

Valentine Special (story)

व्हेलेन्ताइन डे स्पेशिअल स्टोरी कधी कोणावर प्रेम केले असेल तर वाचुन बघाच...... तुझ्या रुपात मन कैद माझे झाले. तो कविता वाचत होता. "गप रे"ति वैतगली होति. जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत.. बाबा मागे लागलेत लग्नासाठी.. माझा हो कळव.. तो हसत म्हणाला.. अन काय कळवणार? तुला ना नोकरी, ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि. अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम, एकमेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न. वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार, म्हणजे घर, दुध, किराणा, मुल,लग्न म्हणजे पैसा..ति म्हणाली हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि. हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल.. अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली.. पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे.. प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि. तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे. तिन अल्टिमेटम दिला.. होता आज खिशात पैसे होते. दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता. त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास, मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली. नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच. ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति. मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला. तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि. हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति.. तो आतुन तुटत चालला होता..प्लिज.. अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली. मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला. तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...तो म्हणाला. ति खळखळुन हसली."वेडा रे"अरे पैसा म्हणजे?... आय नो. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला? लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला. आपण पुढच्या एक वर्षांनी आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु. अन काय करु..तिन विचारल.. मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...तुला संसारा साठी. त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन... तो हसत म्हणाला."मॅड आहेस."पण म्हणुनच तु मला आवडतो.ति.. पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला. ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली. .....एक वर्षांनी तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता. तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति येइल? तो अस्वस्थ होता ७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली. तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला. हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली. कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते. म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली. ति वाकली असताना, त्याला ब्लाउज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला. अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता. अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल. काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला. मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली.. त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर. ७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे.. जाउ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली. मला पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता... तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला. सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते. तो बॅन्केत आहे, १ बेडरुमच घर आहे... तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी.. तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर.... वायाच गेल असत. तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि . निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता.. तो बराच वेळ बसुन होता. सार संपल होत. रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल.. सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले. सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल. टॅक्सी वेगात चालली होति, गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत. विमान तळावर टॅक्सी थांबली, त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला, सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली, सर, तुमची बॅग राहिली आहे, त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला "त्यात ७५ लाख रुपये आहेत. जवळच्या अनाथ आश्रमाला दान कर तुझ्या नावे. नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि." ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता कडु गोड आठवणीत तुझ्या साठव मला मैत्रीचा हात हवा असल्यास आठव मला माझ्या वाटेचा आनंद तुझ्याकडे ठेव तुझ्याकडे काही दु:ख असतील तर पाठव मला..... आधी विचार करा, मग कृती करा!!! Courtesy:- pune tm

Thursday, February 2, 2012

स्वर्गाच management change झालय

आज काल देव सुद्धा वरदान, सुलभ हफ्त्यामध्येच देतो, त्याच्या प्रत्येक तथास्तु नंतर, * कन्डीशन अप्लाय असतो. भक्त घोर तपश्चर्या करतो, मग देव प्रकट होतो, काय हवे ते माग म्हणुन, दोनपैकी एक बोट निवडायला सांगतो. भक्त नाराज होउन म्हणतो, देवा तुला काय झालय, देव म्हणतो "मी तोच आहे पण", स्वर्गाच management चेन्ज झालय. >अपरिचित

Wednesday, February 1, 2012

व्यसनाधीनता

लोकांना बऱ्याच प्रकारची व्यसन असतात. पण आपण म्हणतो ती व्यसनाधीनता म्हणजे सिगारेट ,दारू,गुटखा,जुगार,बाईचा नाद हे होय. बहुतेक सर्व व्यसनांमध्ये एक समानता असते. उदाहरणे द्यावयाचे झाल्यास पुढीलप्रमाणे -सिगारेटचे देता येईल .बिडी ओढणाऱ्यांपासुन ५५५ चे पाकीट ओढणारा .म्हणजेच व्यसनांची किंमत ही खालपासुन वरपर्यंत वाढत जाते. दारू च घ्या देशी पिणाऱ्यांपासुन उंची विदेशी पिणाऱ्यांपर्यंत .दुर्दैवाने म्हणाव लागत पण ती वस्तुस्थिती आहे वेश्या- बाजरात ही अशीच चढणारी आणि उतरणारी किंमत असते. आता गुटखा खाणाऱ्यांनाच विचारा मधला ' ट' काढल्यास बहुधा ते काय खात असतील यांची कल्पना त्यांना येत असेल. जुगार खेळणाऱ्याचे ही तसेच आहे . छोटी खेळी खेळता खेळता मोठी खेळी तो कधी खेळू लागतो ते त्याच त्याला कळत नाही. म्हणजेच आपण अर्थ काढू शकतो की व्यसने ही सर्व वर्गासाठी आहे पण ऐपतीप्रमाणे . गरीबांची व्यसने वेगळी, मध्यमवर्गाची वेगळी , उच्चभ्रु वर्गाची वेगळी . लहानपणी वाचले होते भुगोलाच्या पुस्तकात विविधतेतच एकता आहे ती एकता बहुधा व्यसनांना लागू पडते. आपण म्हणतो तो वाया गेलाय का तर तो सिगारेट पितो. पण सिगारेट पिणारा वाया कसा जातो ते हळूहळू लक्षात येते.आधी सिगारेट मग दारू मग पुढेपुढे व्यसनांची पायऱ्या चढत तो कसा वाया जातो आणि आपण त्याच्यासाठी एक गाण ही म्हणतो -काय होतास तु काय झालास तु ,अरे वेड्या मुला वाया गेलास तु. पण आपल दुर्देव असे की हल्ली व्यसन ही फॅशन बनलीय. काळाप्रमाणे चालणे आपल्याला आवडत असल्याने आपण बहुधा व्यसनांकडे दुर्लक्ष करतो .आपला शारीरीक व मानसिक ऱ्हास होतोय हे आपण विसरतो. किंवा कळतय पण वळत नाही. म्हणूनच कोणितरी म्हटलय व्यसन हे कधीही सुटत नाही ते सोडण्यासाठी निश्चय करावा लागतो. असे हे जीवन…..! जगण्यापेक्षा मेलेले बरे पण भीती वाट्ते मरणाची म्हणुन थोडेसे प्यायलेले बरे. मी मेल्यावर गंध गुलाल लावुनी तिरडी माझी सजवा . मात्र त्यावर टाकावयाची फुले दारुत आधी भिजवा. माझ्या अंत यात्रेला सर्वजण शुद्धित असावेत मात्र चार खांदेकरी थोडेसे प्यायलेले असावेत. हे सर्व पाहुन तुम्ही म्हणाल.. बरं झालं बेवडा गेला ! पण दारु प्यायलेले म्हणतील.. आमचा "जोडीदार"मेला. .....अपरिचित

Saturday, November 12, 2011

संभाजीराजांची खरी ओळख ||---
शिवपुत्र धर्मवीर संभाजीराजे !
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल
अस्सल पुराव्याअभावी परकियांनी बरेच विकृत
लिखाण केले. संभाजीराजांच्या वधानंतर
झुल्फीकारखानाने रायगडचा पाडाव केला व
तेथील सर्व दप्तरखाना व कागदपत्रे जाळून
टाकली त्यामुळे सर्व पुरावेच नष्ट झाले. विकृत व
चुकीच्या लिखाणामुळे समाजात शंभूराजांबद्दल
बरेज गैरसमज निर्माण झाले. आज
ही चुकीच्या इतिहासामुळे आपण अजूनही एकात्म
होऊ शकलो नाही; परंतु
औरंगजेबाच्या दरबारातील खाफीखान याने
संभाजीराजांबद्द ल केलेले वर्णन जेव्हा उजेडात
आले त्यानंतर मात्र आमचे डोळे उघडले.
खाफीखानाने संभाजीराजांचे वर्णन
`सत्तेची नशा चढलेला राजा'असे केले; पण ग्रँड
डफ याने या वाक्याचा `ध'चा `मा'केला व
`दारूची नशा चढलेला राजा'असे केल्याने
`संभाजी म्हणजे
रंगेल'राजा असा चुकीचा इतिहास
आम्हाला शिकावा लागला.
हिंदुत्वाचे महान रक्षक : धर्मवीर
संभाजीराजे !
महाराष्ट्राचा तेजस्वी आणि प्रेरणादायी इतिहास
दुर्दैवाने गोर्या कातडीच्या इंग्रजांनी कलंकित
करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे
समाजाची बराच काळपर्यंत दिशाभूल
झाली होती. श्री छत्रपती संभाजी महाराज हे
अत्यंत तेजस्वी आणि महापराक्रमी प्रजापालक
होते.
औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासू न
दूर ठेवणारे संभाजीराजे
संभाजीराजांनी जी अलौकिक कामे
त्यांच्या अल्पायुष्यात केली,
त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर
झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदु
बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे.
त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न
डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल
सरदारांना लढाईत पराभूत करून
त्यांना पळता भूई थोडी केली. त्यामुळे औरंगजेब
दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत
राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान
त्याच्या दडपणापासून मुक्त राहिला.
ही संभाजीराजांची सगळयात
मोठी कामगिरी म्हणावी लागेल.
त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला असता, त्याचे
मांडलिकत्व स्वीकारले असते, तर तो दोन-तीन
वर्षांत पुन्हा उत्तरेत गेला असता; परंतु
संभाजीराजांच्या संघर्षामुळे २७ वर्षे औरंगजेब
दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेत
बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान
या ठिकाणी हिंदूंच्या नवीन
सत्ता उदयाला येऊन हिंदु
समाजाला सुरक्षितता लाभली.
संभाजीराजांच्या
सामर्थ्याची पोर्तुगिजांना भीती
संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून
धर्मवेड्या पोर्तुगिजांना नमवले.
त्यांच्याशी तह करून त्यांना बांधून टाकले.
गोव्यातील पोर्तुगिजांच्या
धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायबंद
घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण
झाले, हे विसरणे अशक्य आहे. पोर्तुगीज
संभाजीराजांना प्रचंड भीत असत.
त्यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले
आहे, ``सध्याच्या परिस्थितीत संभाजी महाराज
हेच सर्वशक्तीमान आहेत, असा आमचा अनुभव
आहे !''शत्रूचे हे प्रमाणपत्र
महाराजांच्या सामर्थ्याविषयी कल्पना देणारे
आहे.
संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !
संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास
लोकांना नीट माहीत नाही. १
फेब्रुवारी १६८९
या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के
याच्या फितुरीमुळे संगमेश्वर
या ठिकाणी संभाजीराजे
काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत
असतांना पकडले गेले. आमचा पराभव
करण्याची ताकद आज जगातील
कोणत्याही शक्तीला नाही. आमचा पराभव
आमच्यातील गद्दार फितूर मंडळींमुळेच झाला,
याची अनेक उदाहरणे आहेत.
अगदी वर्तमानकाळही त्याला अपवाद नाही.
शंभूराजांचे वेळीसुद्धा हेच झाले. येसुबाईचे थोरले
बंधू म्हणजे शंंभूराजांचे मेव्हणे गणोेजी शिर्के
हिंदवी स्वाराज्याशी बेईमान-फितूर झाले.
संभाजीराजे कवी कलशाचे कलाने वागतात म्हणून
कलशावर पन्हाळा भागात त्यावर
हल्ला चढवला,
ही बातमी जेव्हा संभाजी महाराजांना कळली,
तेव्हा ते लगेच शिर्क्यांचा बिमोड
करण्यासाठी विशालगडावर आले. शंभूराजे चालून
येत असल्याचे कळताच गणोजी शिर्के संगमेश्वर
भागात पळून गेले.
शिर्क्यांच्या मदतीला औरंगजेबाचे सैन्य
येण्यापूर्वीच संभाजीराजांनी कवी कलश,
संताजी घोरपडे, मालोजी घोरपडे, खंडोबल्लाळ
चिटणीस यांच्यासह शिर्क्यांची बंडाळी मोडून
काढली व त्याचा जबरदस्त पराभव केला. तिकडे
झुल्पीकार खान रायगडावर चालून येत
असल्याची खबर राजांना मिळाल्याने शंभूराजे
सातारा-वाई-महाड मार्गे रायगडावर
परतणार होते; पण मुकर्रबखान कोल्हापूरपर्यंत
येऊन पोहोचल्यामुळे शंभूराजांनी संगमेश्वर
मार्गाने चिपळूण-खेड मार्गे रायगडावर
जाण्याचा बेत केला. शंभूराजे स्वत:
संगमेश्वरी आल्याची वार्ता आसपासच्या भागात
वार्यासारखी पसरली. शिर्क्यांच्या बंडाळीमुळे
उद्ध्वस्त झालेली मंडळी आपल्या तक्रारी घेऊन
संभाजीराजांकडे येऊ लागली.
रयतेच्या तक्रारी समजून घेऊन त्या सोडवण्यात
त्यांचा वेळ गेला आणि संगमेश्वरला ४-५
दिवसांचा मुक्काम करावा लागला. तिकडे
कोल्हापूरवरून मुकर्रबखान निघून चालू येत
असल्याचे राजांना कळले. कोल्हापूर ते संगमेश्वर
हे अंतर ९० मैलांचे
आणि तेसुद्धा सह्याद्रीच्या दर्याखोर्यांन
ी व्यापलेले अवघड वाटेचे ! त्यामुळे किमान
८-१० दिवसांच्या अंतराचे; परंतु फितूर
झालेल्या गणोजी शिर्क्याने
मुकर्रबखानाला जवळच्या आड वाटेने केवळ ४-५
दिवसांतच संगमेश्वरला आणले.
संभाजीचा बदला घेण्याच्या उद्देशाने
शिर्क्यांनी फितुरी केली होती व
आपली जहागीरी प्राप्त करण्यासाठी त्याने
हा उद्योग केला. त्यामुळे १ फेब्रुवारी १६८९
रोजी मुकर्रबखानने त्याच्या ३ हजार
सेनेच्या मदतीने शंभूराजांना वेढ्यात पकडले.
संभाजीराजांचा वेढा तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न
संगमेश्वरला ज्या सरदेसाई यांच्या वाड्यात
शंभूराजे मुक्कामाला होते,
त्या वाड्याला खानाचा वेढा पडला, हे
जेव्हा राज्यांच्या लक्षात आले,
तेव्हा त्यांना आश्चर्यच वाटले; कारण
इतक्या कमी दिवसांत खान येणे शक्यच नाही, हे
त्यांना माहीत होते; पण ही किमया केवळ
फितुरीची होती, हेसुद्धा त्यांच्या लक्षात आले.
शंभूराजांनी अगोदरच आपली फौज रायगडकडे
रवाना केली होती व केवळ ४००-५०० सैन्यच
हाताशी ठेवले होते. याच वेळी शंभूराजांकडे
कृष्णाजी चिमूल व अर्जोजी यादव हे
आपल्या तक्रारी घेऊन आले होते.
आता खानाचा वेढा मोडून रायगडकडे प्रयाण
करणे हा एकमेव पर्याय राजांपुढे शिल्लक होता;
म्हणून राजांनी शत्रूवर तुटून पडा, असा आदेश
आपल्या सैनिकांना दिला. या परिस्थितीतही न
डगमगता शत्रूचा वेढा तोडून संभाजीराजे,
संताजी घोरपडे व खंडोबल्लाळ
रायगडच्या दिशेने वेगात निघाले. दुर्दैवाने
मालोजी घोरपडे या धुमश्चक्रीत ठार झाले; पण
संभाजीराजे व कवी कलश हे मात्र वेढ्यात अडकले.
संभाजीराजांनी याही स्थितीत
आपला घोडा वेढ्याच्या बाहेर काढला होता;
पण मागे
असणार्या कवी कलशाच्या उजव्या हाताला मुकर्रबखानाचा बाण
लागून ते खाली पडल्याने
त्यांना वाचवण्यासाठी राजे पुन्हा मागे वळले
आणि वेढ्यात सापडले.
स्वकियांच्या बेईमानीमुळे राजांचा घात !
या वेळी अनेक सैनिक ठार झाल्यामुळे त्यांचे घोडे
इतस्तत: उधळत होते सर्वत्र
धुरळा उडाला होता. कोणालाच स्पष्ट दिसत
नव्हते. त्याचा फायदा घेऊन शंभूराजे
पुन्हा सरदेसाइंर्च्या वाड्यात शिरले.
त्यांचा घोडा मात्र तिथेच होता.
धुरळा खाली बसल्यावर
गणोजी शिर्क्यांनी शंभूराजांचा घोडा ओळखला;
कारण राजांच्या घोड्याच्या पायात
सोन्याचा तोडा असायचा व हे
शिर्क्यांना माहीत होते; म्हणून
त्यांनी खानाच्या सेनेला संभाजींचा शोध
जवळपासच घ्यावा, अशी सूचना केली. अखेर
मुकर्रबखानच्या मुलाने म्हणजे इरवलासखानाने
शंभूराजांना पकडले. फितुरीमुळे
शेवटी सिंहाचा छावा शत्रूच्या हाती गवसला.
जंग जंग पछाडूनसुद्धा सतत ९ वर्षे सात लाख
सेनेच्या हाती जो सापडला नाही,
बादशहाला ज्याने कधी स्वस्थता लाभू
दिली नाही,
असा पराक्रमी योद्धा स्वकियांच्या बेईमानीमुळे
मोगलांच्या जाळयात अडकला.
संभाजीराजांच्या बलीदानानंतर महाराष्ट्रात
क्रांती घडली
संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण
महाराष्ट्र पेटून
उठला आणि पापी औरंग्याबरोबर
मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला.
`गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले
झाले, घराघरातील माता-
भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड
घ्यायला सांगू लागल्या', असे त्या काळाचे सार्थ
वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे
मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला,
ही तीनशे वर्षांपूर्वीच्य ा राष्ट्रजीवनातील
अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे
इतिहासाला कलाटणी मिळाली.
जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत
गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत
पोहोचली. जागोजागी मोगलांना प्रखर
विरोध सुरू झाला आणि अखेर महाराष्ट्रातच
२७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर
औरंगजेबाचा अंत
झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून
हिंदूंच्या शक्तीशाली साम्राज्याचा उदय
झाला.
२७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध
मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव,
संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते; परंतु
या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या
बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच.
"श्री शिवरायांच्या अकाली मृत्यूनंतर नऊ वर्षे
संभाजीराजांनी औरंगजेबाच्या टोळधाडीपासून
हिंदवी स्वराज्याचे संरक्षण आणि संवर्धन केले.
फितुरीमुळे शत्रूच्या तावडीत
सापडलेल्या राजांनी मृत्यू स्वीकारला; परंतु
स्वधर्म आणि स्वाभिमान सोडला नाही !
त्यांच्या बलीदानामुळे मराठे पेटले आणि मोगल
हटले ! हा महाराष्ट्राच्या विजयाचा ज्वलंत
इतिहास आहे.

Friday, November 4, 2011

फुलसुंदरी

ऋतू वसंत होता
होती पहाटेची वेळ
शहरातल्या बागेमध्ये
होती बहरली वेल
पहाटेच्या धुक्यामध्ये
होती न्हाली फुले
त्यांतही अतीसुंदर
होतीस तू गडे
सारून अंधार रातीचा
आले रवीचे दूत
पण होतीस तू चिंब
धुंदीत अपुल्या धुंद
वारा होता गात
कसले बेताल गाणे
पण त्याही नादावारती
होतीस झुरत तू गडे
न कळले मला कधीही
तुझे ते अबोल झुरणे
झुरण्यातील तुझ्या ती जादू
मम चित्त नकळत झुरवे
होता नादावर त्या धुंद
दिसले नभीचे प्रीतरंग
अवघी वसुंधरा भरिली
पसरे अनोखा एक गंध
करून निश्चय मनीचा
सरसावलो मी पुढे
करीन प्रेम जीवापाड
जरी फुलपाखरू मी इवले
वेलीकडून मागीतले तुला
फुलांतूनही तुलाच निवडले
लाजलीस अशी मान वळवून
फुलराणी ग तू माझीच सखे
वेळी फुलांच्या साक्षीने
होईल लगीन अपुले
जाऊ जोडीने मग आपण
राविरायाच्या आशिर्वादाला
स्वप्ने होती अनेक मनात
उतरवले नाही ज्यांना शब्दांत
नशिबाने फिरवली चक्रे अशी
स्वप्ने तुटली जाग येत क्षणी
कुणीतरी धरीले मला
रंगीत नाजूक माझ्या पंखांना
टाकले काचेच्या बाटलीत एका
केले नंतर झाकणबंद तिला
क्षमा याचना करुनी थकलो
एकदा तरी पाहुद्या तिला
टाहो फोडुनी ओरडू लागलो
तरी नाही आली दया त्यांना
बाटलीतून नेताना मला
पहिले मी वेलीकडे एकवार
पाहुनी झाली अवस्था माझी
एकदा नाही हजारदा मेल्यासारखी
मला बाटलीतून नेताना पाहून
हासत होत्या फुलवेली
तिच्याकडे पाहता थोडे वळून
तिने हसून चक्क मान वळवली
बाटलीतून जाता जाता
आले भरून डोळे
जेंव्हा तिच्या हसण्यातले
मर्म मना उमगले

Monday, September 26, 2011

क्रिकेटप्रेमी सचिन भक्तांनो----------------
माझ्या लाडक्या क्रिकेटप्रेमी तमाम
भक्तांनो,
सप्रेम नमस्कार. वि.वि
मित्रहो आता पत्र लिहितो आहे ते खास
कारण म्हणूनच. परवा जगातील
एकेकाळचा गोलंदाज शोएब अख्तर
याच्या आत्मचरित्रावरून जो गोंधळ
तुम्ही उडवलात त्यामुळे आम्ही हे पत्र
लिहिण्यास मजबूर झालो. असो. तर
माझ्या माहितीप्रमाणे सचिन तेंडुलकर
हा मला फलंदाजी करताना भीत
होता या त्याच्या वाक्यावरुन
तुमची तळपायाची आग
मस्तकाला गेली.सार्या देशात एकाच गहजब
तुम्ही केलेत.कोण म्हणाले शोएबने
माफी मागावी.कोणी त्याच्या त्या तथाकथित
आत्मचरित्र प्रकाशनाचा कार्यक्रम उधळणार
होते,तर कोणी विषारी भाषेत
शोएबचा उद्धार करून आपले सचिनप्रेम दाखवत
होते.
मित्रांनो आपल्या देशात आजपर्यंत
धर्माच्या ,जातीच्या,
भावना दुखावायच्या पण इथून पुढे
क्रीडप्रेमींच्याही भावना दुखवणार आहेत हे
तुम्ही जगाला समजावून दिलेत.
मित्रांनो क्रिकेट हा खेळ आहे. या खेळत टाकले
असतील शोएबने सचिनला काही बॉल. वाटले
असेल त्याला की सचिन माझ्या गोलंदाजीवर
गडबडतोय. म्हणून त्याने लिहिले असेल त्याने
तसे,किंवा सचिनसारझ्या महान
व्यक्तिमत्वावर असले काही लिहिले
की आपोआप आपले पुस्तक बेस्ट-सेलर बनेल
म्हणूनही. पण यात तुमचे काय गेले? सचिन
मला भीत होता असे जर कोणी शोएब
त्याला म्हणत असेल तर तेवढ्याने
काही सचिनची महानता थोडीच कमी होणार
होती? ज्या सचिनबाबत तो जे
काही बोलला त्याने याबाबत ब्र
ही काढला नाही,मग तुम्ही का बरे इयटके
उतावीळ झाला?
मित्रांनो तुम्हाला भारतीय
मानसिकतेतील व्यक्तिस्तोमाचा रोग झालाय
असेच म्हणावे लागेल. सचिन क्रिकेट चांगले
खेळतो, सचिन हा नम्र आहे. सचिम
जितका चांगला क्रिकेटर आहे तितकाच
किंवा त्याहूनही श्रेष्ठ असा माणूस आहे.हे सगळे
मला मान्य आहेच. पण म्हणून तुम्ही सचिनला देव
करून टाकता ते मला पटले नाही.
मध्यंतरी द्या सचिनला भारतरत्न
असा धोशा तुम्हा मंडळींनीच काढला होता.
अरे सचिन हा खेळाडू आणि त्याचे यश हे
एखाध्या पुरस्काराच्या ही पुढे गेले आहे,हे
तुम्हाला केव्हा समजणार? पण एखाद्याला देव
केला त्याच्या भजनी लागायचे, त्याचा उदो-
उदो करायचा हा एक-कलमी कार्यक्रम
तुम्ही राबवता.
मित्रांनो मला आठवते,आम्हाला 9वी का 10
वी ला प्रा. जनार्दन वाघमारे
यांचा 'महापुरुषांचा पराभव' या नावाचा एक
पाठ होता. त्यात ते सांगतात
की महापुरुषांना जीवनात कोणाकडून पराभव
स्वीकारावा लागतो तो म्हणजे
त्यांच्या आंधळ्या अंनुयायांकडून!
आणि गेल्या 2,3 दिवसातील
घटना पहिल्या की तुम्ही सचिनचे किती आंधळे
भक्त आहात ते लक्षात येते.
आमची ज्याच्यावर निष्ठा आहे
त्याला कोणी काही म्हणायचे
नाही.आम्हाला जो खेळाडू
आवडतो त्याच्या खेळ;आवर
कोणी टीका करायची नाही. त्याच्यावर
एकधी खेळाडू व्यक्ति चांगले लिहीत असेल तर
त्याच्या आम्ही मोठ्या बातम्या करून
लावणार, पण त्याच्या खेळाच्या दर्जावर
मात्र कोणी बोलायचे नाही. एवढेच न्हावे तर
त्याचा आम्ही ठरवेल तो दर्जा सर्वांनी मान्य
करायचं ही तुमची हिटलरशाही!
मागे आण्णा हजारे यांचेही असेच भक्तगण
देशात तयार झाले होते.मी कुठेतरी वाचले
की आण्णा हजारे यांचे मध्यप्रदेशात मंदिर
बांधले जाणार आहे.,तेव्हा आता तुम्ही सचिनचे
देखील एखादे मंदिर बनवून त्याला दगड
बनवणार नाही कशावरून?
ज्या डॉन ब्र्याडमन यांनी सचिनमध्ये
स्वताला पहिले आहे
त्या सचिनला एखादा गोलंदाज
काही म्हटला म्हणून आपले सामाजिक
पर्यावरण बिघडवणे यात कोणते आले आहे
शहाणपण?
कळावे,
भुरटा.
पत्र लिहितो आहे ते खास
कारण म्हणूनच. परवा जगातील
एकेकाळचा गोलंदाज शोएब अख्तर
याच्या आत्मचरित्रावरून जो गोंधळ
तुम्ही उडवलात त्यामुळे आम्ही हे पत्र
लिहिण्यास मजबूर झालो. असो. तर
माझ्या माहितीप्रमाणे सचिन तेंडुलकर
हा मला फलंदाजी करताना भीत
होता या त्याच्या वाक्यावरुन
तुमची तळपायाची आग
मस्तकाला गेली.सार्या देशात एकाच गहजब
तुम्ही केलेत.कोण म्हणाले शोएबने
माफी मागावी.कोणी त्याच्या त्या तथाकथित
आत्मचरित्र प्रकाशनाचा कार्यक्रम उधळणार
होते,तर कोणी विषारी भाषेत
शोएबचा उद्धार करून आपले सचिनप्रेम दाखवत
होते.
मित्रांनो आपल्या देशात आजपर्यंत
धर्माच्या ,जातीच्या,
भावना दुखावायच्या पण इथून पुढे
क्रीडप्रेमींच्याही भावना दुखवणार आहेत हे
तुम्ही जगाला समजावून दिलेत.
मित्रांनो क्रिकेट हा खेळ आहे. या खेळत टाकले
असतील शोएबने सचिनला काही बॉल. वाटले
असेल त्याला की सचिन माझ्या गोलंदाजीवर
गडबडतोय. म्हणून त्याने लिहिले असेल त्याने
तसे,किंवा सचिनसारझ्या महान
व्यक्तिमत्वावर असले काही लिहिले
की आपोआप आपले पुस्तक बेस्ट-सेलर बनेल
म्हणूनही. पण यात तुमचे काय गेले? सचिन
मला भीत होता असे जर कोणी शोएब
त्याला म्हणत असेल तर तेवढ्याने
काही सचिनची महानता थोडीच कमी होणार
होती? ज्या सचिनबाबत तो जे
काही बोलला त्याने याबाबत ब्र
ही काढला नाही,मग तुम्ही का बरे इयटके
उतावीळ झाला?
मित्रांनो तुम्हाला भारतीय
मानसिकतेतील व्यक्तिस्तोमाचा रोग झालाय
असेच म्हणावे लागेल. सचिन क्रिकेट चांगले
खेळतो, सचिन हा नम्र आहे. सचिम
जितका चांगला क्रिकेटर आहे तितकाच
किंवा त्याहूनही श्रेष्ठ असा माणूस आहे.हे सगळे
मला मान्य आहेच. पण म्हणून तुम्ही सचिनला देव
करून टाकता ते मला पटले नाही.
मध्यंतरी द्या सचिनला भारतरत्न
असा धोशा तुम्हा मंडळींनीच काढला होता.
अरे सचिन हा खेळाडू आणि त्याचे यश हे
एखाध्या पुरस्काराच्या ही पुढे गेले आहे,हे
तुम्हाला केव्हा समजणार? पण एखाद्याला देव
केला त्याच्या भजनी लागायचे, त्याचा उदो-
उदो करायचा हा एक-कलमी कार्यक्रम
तुम्ही राबवता.
मित्रांनो मला आठवते,आम्हाला 9वी का 10
वी ला प्रा. जनार्दन वाघमारे
यांचा 'महापुरुषांचा पराभव' या नावाचा एक
पाठ होता. त्यात ते सांगतात
की महापुरुषांना जीवनात कोणाकडून पराभव
स्वीकारावा लागतो तो म्हणजे
त्यांच्या आंधळ्या अंनुयायांकडून!
आणि गेल्या 2,3 दिवसातील
घटना पहिल्या की तुम्ही सचिनचे किती आंधळे
भक्त आहात ते लक्षात येते.
आमची ज्याच्यावर निष्ठा आहे
त्याला कोणी काही म्हणायचे
नाही.आम्हाला जो खेळाडू
आवडतो त्याच्या खेळ;आवर
कोणी टीका करायची नाही. त्याच्यावर
एकधी खेळाडू व्यक्ति चांगले लिहीत असेल तर
त्याच्या आम्ही मोठ्या बातम्या करून
लावणार, पण त्याच्या खेळाच्या दर्जावर
मात्र कोणी बोलायचे नाही. एवढेच न्हावे तर
त्याचा आम्ही ठरवेल तो दर्जा सर्वांनी मान्य
करायचं ही तुमची हिटलरशाही!
मागे आण्णा हजारे यांचेही असेच भक्तगण
देशात तयार झाले होते.मी कुठेतरी वाचले
की आण्णा हजारे यांचे मध्यप्रदेशात मंदिर
बांधले जाणार आहे.,तेव्हा आता तुम्ही सचिनचे
देखील एखादे मंदिर बनवून त्याला दगड
बनवणार नाही कशावरून?
ज्या डॉन ब्र्याडमन यांनी सचिनमध्ये
स्वताला पहिले आहे
त्या सचिनला एखादा गोलंदाज
काही म्हटला म्हणून आपले सामाजिक
पर्यावरण बिघडवणे यात कोणते आले आहे
शहाणपण?
कळावे,
भुरटा.